• व्हिडिओ
  • डाऊनलोड
  • गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना kalnkurfou@gmail.com यावर कळवा

    रविवार, २२ मार्च, २०२६

    विद्यार्थ्यांची सुमधुर संगीत सभा उत्साहात संपन्न

    विद्यार्थ्यांची सुमधुर संगीत सभा उत्साहात संपन्न










































    छत्रपती संभाजीनगर : कलांकुर फाउंडेशन संचलित गुरुदेव संगीत विद्यालय प्रस्तुत ‘विद्यार्थ्यांची सुमधुर संगीत सभा’ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गायत्री मंत्र व “ॐ गणपते नमो नमः” सादर करून वातावरण भक्तिमय केले. पुढे गणेश वंदना, विविध रागांवरील सादरीकरणे तसेच तबला वादनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. या सभेत भक्ती, साधना, आदिती, स्वरा, सांची, सावी बोचरे, राजवीर बोचरे, अक्षरा मरगळ, श्रीरूप नालिंदे, श्रेयस फड, लुंबिनी तिकटे, सानवी, स्वदीप होळकर, देवांश होळकर, भाग्यराज, श्री. भरत संत, स्वरा वानखडे, भक्ती संत, अर्णव सोरमारे, सार्थक गाडेकर, जय गायकवाड या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे राष्ट्रीय प्रथम क्रमांक विजेता अवनीश सूर्यवंशी व आकाशवाणी कलाकार स्वरांगी शिंदे यांचे तबला वादन सादरीकरण होय. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. कार्यक्रमाला उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटात प्रोत्साहन दिले. या संगीत सभेच्या यशस्वी आयोजनासाठी व मार्गदर्शनासाठी श्री भरत संत सर व त्यांच्या परिवाराने विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.