• व्हिडिओ
  • डाऊनलोड
  • गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना kalnkurfou@gmail.com यावर कळवा

    बुधवार, ८ मे, २०२४

    सामवेद आणि भारतीय शास्त्रीय संगीत

     सामवेद आणि भारतीय शास्त्रीय संगीत


    भारतीय संगीतातील विविध रागरागिण्यांचं मूळ सामवेदात आढळतं. किंबहुना, सामवेदातील काही स्वररचनांमधूनच भारतीय शास्त्रीय संगीतातल्या अनेक स्वरावली उगम पावल्या असंही म्हणता येईल. आपल्या हिंदुस्थानी किंवा भारतीय संगीतातल्या 'श्रुती' आणि 'स्वर' या मूलभूत संकल्पना सामवेदातूनच आल्या आहेत.


    विज्ञान काय म्हणतं? राग-उपचार पद्धतीवरील संशोधन


    रागचिकित्सा किंवा राग उपचारपद्धती ही प्रकृती बरी करण्याच्या प्राचीन पद्धतींवर आधारित आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील तत्त्वांबरहुकूम तिचा उपयोग केला जातो. काही अभ्यासकांनी संगीतउपचार पद्धतीवर खूपच संशोधन केलं असून त्यामध्ये विशिष्ट राग-रागिण्यांचा शरीरावर आणि मनमस्तिष्कावर होणारा परिणामही बारकाईनं अभ्यासला आहे.