• व्हिडिओ
  • डाऊनलोड
  • गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना kalnkurfou@gmail.com यावर कळवा

    सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

    🌹सा रे ग म प ध नी सां 🌹
    🌺सा 🌺
    सावधान असावे भजनी |
    🌺 रे  🌺
    रेशमा सारखी मृदु असावी वाणी |
    🌺 ग 🌺
    गर्व नसावा मानसी,परोपकारी असावी वृत्ती |
    🌺 म 🌺
    मधुर सुरेल संगीताने वाढवावी भजनाची गोडी |
    🌺 प 🌺
    परावृत्त करावे सकलांसी गैरमार्गा पासुनी |
    🌺 ध 🌺
    धरूनी ईश्वर नामाची कास प्रबोधन करावे भजनी |
    🌺 नी 🌺
    नीत्य गावी हरीकथा (सकल संत गाथा )तेणे मोद होईल भगवंता |
    🌺 सां 🌺
    साधकही उध्दरतील भजन श्रवण करीता |
    🌷 ऐसा हा 'सा रे ग म प ध नी सां' स्वरांचा महिमा जाणावा सकलानी (भजनी बुवानी) आणि आचरण शुध्द ठेऊनी रंगावे भजनी ||






    बुधवार, २५ नोव्हेंबर, २०१५

    रागाचे गुण विशेष

    रागाचे गुण विशेष :
    १ राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा
    २ राग यमन – कार्य शक्री वाढवणारा
    ३ राग देसकर – उत्थान व संतुलन साधणारा
    ४ राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा
    ५ राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणिव करून देणारा राग
    ६ राग शाम कल्याण – मूलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा
    ७ राग हमिर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि उर्जा निर्माण करणारा
    ८ राग केदार – स्वतःच्या कर्तत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारून भरपूर उर्जा निर्माण करणारा तसेच     मुलाधार उत्तेजित करणारा
    ९ राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधुन अहंकार संतुलनात आणनारा
    १० राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व अध्यात्मीक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा
    ११ राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा भावनाप्रधान राग सर्व सदिच्छा पूर्णकरून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग
    १२ राग मालकंस – अतिशय शांत - मधुर राग प्रेमभाव निर्माण करणारा व संसारिक सुख वृध्दिंगत करणारा
    १३ राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग हा अध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जाग्रत करणारा असा आहे
    १४ रग जयजयवंती – सुख समृद्धि दणारा राग असून यश दायक आहे विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो
    १५ राग भिम पलासी – संसार सुख व प्रेम देणारा
    १५ राग सारंग – कल्पना शक्ती व कर्यकुशलता वढिस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो  आत्मविश्वास वाढिस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग
    १६ राग गौरी – शुध्द इच्छा , मर्यादाशिलता , प्रेम , समाधान , उत्थान इत्यादी गुण वर्धक राग. डाव्या

    मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०१५

    व्हिडिओ

    दि. १३. ०९. २०१५ रोजी विद्यालयाचा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा झाला. 

    त्यानिमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गायन वादनाचे उत्कृष सादरीकरण केले. त्यातील काही विडिओ

    स्वरांगी शिंदे आणि हर्षवर्धन पवार याचा विडिओ ----





    माझे परममित्र मा. श्री . उमाप सर 

    यांनी माझ्यासाठी केलेली हि छानशी कविता  



    अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे 

    आयोजित स्पर्धेत विद्यालयाचा विजेता तबला सहवादानाचा 

    जी. एस. व्हि. ताल ग्रुप 


    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ऑनलाईन व्हिडिओ ला भेट द्या . 
    धन्यवाद  

    सोमवार, १६ नोव्हेंबर, २०१५

    गायन, वादन, नृत्य या विषयांची लिखित परीक्षा

    अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ , मिरज 

    तर्फे घेण्यात येणाऱ्या गायन, वादन, नृत्य या विषयांची लिखित परीक्षा दि. २४ -एप्रिल -२०१६ रोजी संपन्न होणार आहेत.

    त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे :-
    गायन परीक्षा वेळ 
    सकाळी ०९:०० ते ११:०० प्रवेशिका पुर्ण 
    सकाळी ०९:०० ते १२:०० मध्यमा  प्रथम ते अलंकार पुर्ण 
    तबला परीक्षा वेळ 
    दुपारी ०२:०० ते ०४:०० प्रवेशिका पुर्ण
    दुपारी ०२:०० ते ०५:०० मध्यमा प्रथम ते अलंकार पुर्ण 
    ( विशारद प्रथम ते अलंकार पुर्ण या वर्गांचे २ लिखित पेपर असल्यामुळे दोन्ही सत्रात परीक्षा असते.)

    परीक्षा हि नियोजित वेळेत होत असते. 
    आपल्या आई वडिलांचा आणि गुरुजींचा आशीर्वाद घेऊनच परीक्षेला जावे.
    शिक्षक किंवा केंद्र व्यवस्थापकाशी संपर्क करून परीक्षेबाबत विचारणा करावी-
    जसे ---परीक्षा केंद्र कोणते आहे?
    आगोदर किती वेळ हजर राहावे? वगैरे . . . . .

    परीक्षेला जाताना घ्यावयाची काळजी -

    • आगोदर किमान ३० ते १५ मिनिट हजर राहावे. 
    • सर्वात महत्वाचे हॉल तिकीट घेतले का?
    • पेन, पेन्सील, खोडरबर, पट्टी घेतला का?
    • उत्तरपत्रिकेसाठी रायटिंग बोर्ड घेतला का?? 
    • या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे तपासून पहा 


    आपणास परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा