विष्णू नारायण भातखंडे
विष्णू नारायण भातखंडे
जीवन
भातखंड्यांचा जन्म ऑगस्ट १०, १८६० रोजी जन्माष्टमीच्या दिवशी मुंबईत वाळकेश्वरात झाला. त्यांचे शिक्षण मुंबईचे एलफिन्स्टन कॉलेज व पुण्याच्या डेक्कन कॉलेजात झाले. इ.स. १८८५ साली ते कायद्याचे पदवीधर झाले व इ.स. १८८७ सालापासून वकिली करू लागले. पुढे काही काळ कराचीच्या उच्च न्यायालयात त्यांनी वकिली केली.भातखंड्यांनी त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांत वल्लभदास नावाच्या सतारवादकाकडून सतार शिकायला आरंभ केला. पुढे रावजीबा नावाच्या ध्रुपदगायकाकडून ते गायकी शिकू लागले. गायकी व हिंदुस्तानी संगीताच्या इतर पैलूंबाबत त्यांना बेलबागकर, अली हुसेन खाँ, विलायत हुसेन खाँ यांचेही मार्गदर्शन लाभले.
विष्णू नारायण भातखंडे यांचे पोस्टाचे तिकीट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा