• व्हिडिओ
  • डाऊनलोड
  • गुरुदेव संगीत विद्यालय ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत, आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना kalnkurfou@gmail.com यावर कळवा

    तबला / पखवाज प्रारंभिक अभ्यासक्रम



    अ. भा. गां. म. मं. मिरज अभ्यासक्रम 

    गुरुदेव  संगीत  विद्यालय , औरंगाबाद
    E- mail dbstabla@gmail.com
    Ph - 07588168939


     सर्व शिक्षक  आणि विद्यार्थी मित्रांनो तसेच  संगीत साधकासाठी ,,
    अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मिरज चा पखवाज अभ्यासक्रम पाहण्यासाठी मी आपणास अगदी सोपे करून देत आहे , फक्त आपणास पुढील लिंक्सवर क्लिक करावे लागेल .

    सर्व प्रथम वर्गांची ओळख करून घेऊया. 
    1. वर्ग पहिला : प्रारंभिक
    2. वर्ग दुसरा : प्रवेशिका प्रथम 
    3. वर्ग तिसरा : प्रवेशिका पुर्ण 
    4. वर्ग चौथा : मध्यमा प्रथम 
    5. वर्ग पाचवा : मध्यम पुर्ण 
    6. वर्ग पाचवा :  विशारद  प्रथम 
    7. वर्ग पाचवा : विशारद पुर्ण
    8. वर्ग पाचवा : अलंकार प्रथम 
    9. वर्ग पाचवा : अलंकार पुर्ण

     प्रारंभिक Download

     


    मात्रा :- संगीतामध्ये वेळ मोजण्याच्या साधनाला मात्रा असे म्हणतात 
    ताल :- विशिष्ट मात्रांच्या चौकटीला ताल असे म्हणतात. 
    सम :- सम म्हणजे तालाची पहिली मात्र होय 
    टाळी :- तालातील खंडांच्या वजनानुसार हाताने जी क्रिया केली जाते त्याला टाळी असे म्हणतात. 
    खाली किंवा काल :-  सर्वसाधारणपणे तालातील मात्रांचे दोन समान भाग केले असता दुसऱ्या भागातील पहिल्या मात्रेवर काल येतो. टाळीच्या विरुद्ध क्रिया करून काल दाखविला जातो 
    विभाग किंवा खंड :- तालाच्या वजनानुसार तालातील मात्रांचे जे भाग पाडले जातात त्यांना विभाग किंवा खंड असे म्हणतात 
    एकपट :- एका मात्रेच्या वेळी एक मात्रा म्हणणे लिहिणे वाजविणे त्याला एक पट असे म्हणतात 
    दुप्पट / दुगून :-  एका मात्रेच्या वेळी दोन मात्रा म्हणणे लिहिणे वाजविणे त्यास धुवन असे म्हणतात
    आवर्तन :-  तालाच्या पहिल्या मात्रे पासून पहिल्या मात्रेपर्यंतच्या एका फेऱ्यास आवर्तन असे म्हणतात. 
    बोल :- तबल्यावर वाजणाऱ्या अक्षरांना बोल म्हणतात.

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: